loader
Breaking News
Breaking News
Foto

हदयद्रावक घटना ! शिक्षकाने अल्पवयीन मुलांसह थेट गोदावरी नदीत कार लोटली, तिघांचाही मृत्यू

नांदेड, - जिल्हयात एक हदयद्रावक घटना घडली असून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनिल नारायण मोरे (वय ४२) यांनी आज सकाळी आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह कार थेट गोदावरी नदीपात्रात झोकून देवून आत्महत्या केली. या दुर्घटनेत मुलगी सारा (वय १३) आणि मुलगा सुमित (वय १०) याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ते सकाळीच आपल्या बलेनो कार एमएच २६ सीई ४५८२ ने पुणेगांव येथील गोदावरी नदीवरील पुलावर गेले. सकाळी ७.४५ वा.च्या सुमारास भरधाव कार थेट नदीपात्रातच टाकली. त्यापूर्वी त्यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर तसेच सोशल मिडीयावर काही वरिष्ठ अधिकार्‍यांकडून छळ होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भोकर तालुक्यातील बेंबर गावचे सुनिल मोरे रहिवाशी असून ते हिमायत नगर तालुक्यातील पोटा बुदु्रक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. नांदेड शहराजवळील विमानतळ परिसरात कोकाटे सांगवी येथे वास्तव्यास होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg