loader
Breaking News
Breaking News
Foto

महाविस्तार एआय ॲपद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल शेतीचे मार्गदर्शन

दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या रावे (RAWE) कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी संगिनी विद्यार्थीनींनी साखळोली नं. २ गावातील शेतकऱ्यांना महाविस्तार एआय (MahaVISTAAR-AI) मोबाईल ॲपची माहिती देऊन त्यांच्या मोबाईलमध्ये ॲपची स्थापना करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.या उपक्रमामध्ये १० विद्यार्थी आणि १५ शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार एआय ॲप डाउनलोड करून त्याचा वापर सुरू केला. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बाजारभाव, पीक संरक्षण, कीड-रोग व्यवस्थापन, शासकीय योजना तसेच आधुनिक शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शन सहज उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय अँपचा वापर करून शेतीविषयक माहिती कशी मिळवायची, हवामानाचा अंदाज, बाजारभाव, पीक संरक्षण व शासकीय योजनांची माहिती कशी पाहायची याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अधिकाधिक वापर करण्याचा संकल्प व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg