loader
Breaking News
Breaking News
Foto

रिक्षा चालकांना रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करुन देण्यासाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी वेधले बांधकाम विभागाचे लक्ष

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात अनेक रिक्षा चालक रस्ताकडेला रिक्षा लावून आपला उदरनिर्वाह करत आहेत. काही वेळा रस्त्यावर रिक्षा लावायला मिळत नाही. रिक्षा स्टॅण्ड नसल्याने मोठी गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी रिक्षा चालक, कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग सहाय्यक शाखा अभियंता संभाजी घंटे यांची भेट घेऊन दोडामार्ग येथे रिक्षा स्टॅण्ड करिता जागा उपलब्ध करून द्या, असे निवेदन दिले. यावेळी रिक्षा चालक संतोष हळणकर, राजन देसाई, रामचंद्र हरमलकर, संजय मनेरीकर, गुरु हळणकर, विनय हळणकर, इतर रिक्षा चालक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg