दापोली, : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचलित न. का. वराडकर कला, रा. वि. वेलोसे वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ, शांतिलाल जैन विज्ञान कनिष्ठ आणि इंदुमती यादव माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे संस्थेचे प्रेरणास्थान कै. ॲड. उदय तथा बाळासाहेब वेलोसे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी सकाळी ११.१५ वाजता भावपूर्ण अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कै. ॲड. उदय तथा बाळासाहेब बेलोसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकात प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर यांनी बाळासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. कार्यक्रमास कुणाल शेवडे (संचालक, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून कासीम अ. गणी महालदार (विश्वस्त, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन) यांनी बाळासाहेबांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक संदीप राजपुरे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. आपल्या मनोगतात त्यांनी कै. ॲड. उदय तथा बाळासाहेब वेलोसे यांच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले की, "बाळासाहेब हे राजबिंडे व्यक्तिमत्त्व, आदर्श राजकारणी आणि प्रभावी नेतृत्व लाभलेले व्यक्ती होते. त्यांच्या कार्यात समाजहिताची तळमळ आणि माणुसकीचा जिव्हाळा होता." बाळासाहेबांसोबतचे अनेक प्रसंग आणि आठवणींना उजाळा देत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दशरथ भोसले (सचिव, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन) होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी बाळासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेची झालेली प्रगती अधोरेखित करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक गडकर यांनी केले, तर प्रा. बी. बी.ढवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे प्रियदर्शन बेलोसे, जानकीताई बेलोसे, मीनाकुमार रेडीज, नजीर अरकाटे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.