loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रातील पहिल्या सती शाळा स्मारकाला, डाॅ. विनय नातूंची भेट

संगमेश्वर (प्रतिनिधी) - सिंधू रत्न समृद्ध योजना 2.00 रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी कडवई येथील महाराष्ट्र राज्यातील पहिल्या सती शिळा स्मारकाला भेट देऊन या अभिनव प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. दुर्गवीर अजित राणे यांच्या या यशस्वी संकल्पनेचे कौतुक करून ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व असलेल्या या विषयाचा व स्मारकाचा अभ्यासकांना खूप फायदा होईल आणि इतर गावांना प्रेरणा मिळेल असे उदगार यावेळी त्यांनी काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुर्गवीर अजित राणे यांची संकल्पना साकार होण्यासाठी कडवई ग्रामस्थांनी व ग्रामदेवता मंदिराने केलेल्या सहकार्यांचेही डॉ. नातू यांनी विशेष कौतुक केले. यावेळी दुर्गवीर अजित राणे, डॉ. अमित ताठरे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक जाधव, व्याख्याते श्रीनिवास पेंडसे, दिलीप बडद यांचे सह कडवई ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg