loader
Breaking News
Breaking News
Foto

​वीरसिंग वसावे यांच्याकडे सावंतवाडी उपविभागीय महसूल अधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांतअधिकारी) म्हणून वीरसिंग वसावे यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या मतदार यादी पडताळणी सुरू झाली असल्याने त्या दर्जाचे अधिकारी ते असल्याने ही नेमणूक झाली आहे. ​येथील कार्यरत उपविभागीय महसूल अधिकारी समीर घारे यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सध्या रजेवर आहेत. त्यांच्या रजेच्या काळात काही दिवस भूसंपादन अधिकारी शारदा पोवार आणि सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे या पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र, आता या ठिकाणी वीरसिंग वसावे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वसावे यांनी यापूर्वी सावंतवाडी, दोडामार्ग आणि कुडाळ येथे तहसीलदार म्हणून सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांची रत्नागिरी येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती. सद्यस्थितीत ते सह जिल्हा निबंधक (वर्ग-१) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ​वसावे यांचा स्थानिक जनतेशी दांडगा संपर्क आहे. सर्वसामान्यांना विविध दाखले मिळवून देणे आणि शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांनी नेहमीच विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या अनुभवाचा आणि नियुक्तीचा सावंतवाडी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg