पनवेल : दिल्लीतील राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) प्रश्नपत्रिका फुटी, परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच सरकारच्या कथित दडपशाहीविरोधात 'संविधानप्रेमी नागरिक, पनवेलनवी मुंबई' यांच्या वतीने संविधान कट्टा, खांदा कॉलनी येथे शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. सेक्टर 13, खांदा कॉलनी येथील राष्ट्रीय बँकेजवळील संविधान कट्ट्यावर आयोजित या आंदोलनात स्थानिक नागरिक, युवक, विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, सोनम वांगचुक हे गेल्या वीस दिवसांपासून राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) प्रश्नपत्रिका फुटी, राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत.
18 जुलै रोजी पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून हटवून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेचा निषेधही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना, “भूक, भीती, भ्रम, भेद, भिक आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देशातील लोकशाही धोक्यात आणली जात आहे,“ असा आरोप केला. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व सुधारणा, तसेच शांततापूर्ण लोकशाही आंदोलनाच्या अधिकाराचे संरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या निदर्शनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ, संविधान प्रचारक, सत्यशोधक विद्यार्थी परिषद, माहिती अधिकार महासंघ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
आंदोलनकर्त्यांनी भविष्यातही संविधानिक मार्गाने लोकशाही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच या विषयासंदर्भात राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या आंदोलनादरम्यान कळंबोली वाहतूक पोलिस आणि खांदेश्वर पोलिस यांनी आवश्यक सहकार्य केले. निदर्शनाच्या आयोजनासाठी सुवर्णा सावंत यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.