वेळणेश्वर (उमेश शिंदे) - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून, 'हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज' – गुहागर तालुका रजि. यांच्या वतीने 12 जुलै रोजी तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला. या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून समाजबांधवांनी पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. वृक्ष हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. याच उद्देशाला समोर ठेवून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेमध्ये गुहागर तालुक्यातील हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाजातील सर्व लहान-थोर समाजबांधवांनी एकत्र येत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि विविध प्रकारच्या झाडांचे रोपण केले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे पुढील काळात उत्तम संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील असंख्य समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, संस्थेच्या वतीने उपस्थित राहून प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या आणि या मोहिमेला बळ देणाऱ्या सर्व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. सर्वांच्या एकजुटीमुळे आणि सहकार्यामुळेच हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.