loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा नेते मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर व भाजपा आपत्ती व्यवस्थापन टीम प्रशासनाच्या व अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल

खेड (दिलीप देवळेकर) - रात्री २ च्या सुमारास अनुसया हॉटेल, मुंबई गोवा महामार्ग येथे मोठी दरड कोसळली. रात्रभरापासून मुंबई गोवा हायवे वाहतुकीसाठी बंद. भाजपा नेते मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर व भाजपा आपत्ती व्यवस्थापन टीम प्रशासनाच्या व अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने मुंबई-गोवा हायवेवरती अडकलेल्या प्रवाशांना पाणी बॉटल व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी भाजपा नेते वैभव खडेकर यांनी तालुक्यातील विविध जेसीबी व ट्रक धारक यांना फोन करून लवकरात लवकर हायवेवरील दरड काढण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी स्वराज गांधी, विवेक गांधी, इंदरकुमार रायका, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg