loader
Breaking News
Breaking News
Foto

भूस्खलनामुळे आतले-शेवरे खचलेल्या रस्त्याची मंडणगड भाजपा तालुका अध्यक्ष दत्ता महाडिक यांच्याकडून पाहणी

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील देव्हारे-वडवली-आतले-शेवरे-चिंचघर या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे आतले-शेवरे येथील कड्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे रस्ता खचला असून अन्य गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून भूस्खलनामुळे येणाजाण्याच्या मार्गावर परिणाम झाला आहे. हा रस्ता खचल्याने आणि रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या ठिकाणी भाजपा मंडणगड तालुका अध्यक्ष दत्ता महाडिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा मार्ग तातडीने पूर्ववत सुरू व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले यांच्या कडे विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूस्खलनामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे योग्य पंचनामे करून त्यांना शासनाकडून उचित भरपाई मिळवून देण्यासाठी ते पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पाहणीदौरा वेळी सांगितले. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस यश मेहता, शहर अध्यक्ष आनंद नारकर, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देवळेकर सह अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg