loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील 'अपना नगर’ येथील पादचारी साकव धोकादायक: नागरिकांचा प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीचा आग्रह

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - दापोली नगरपंचायत हद्दीतील ’अपना नगर’ येथील पादचारी साकव (पूल) सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, तो केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने, स्थानिक रहिवासी कुतबुद्दीन अली बर्डे यांनी नगरपंचायतीकडे या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बांधलेला हा लोखंडी पूल परिसरातील नागरिकांसाठी, विशेषतः लहान मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात पादचारी ये-जा करत असतात. जवळच मदरसा असल्याने लहान मुलांची सतत वर्दळ असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, सध्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुलाचे दोन्ही बाजूंचे भाग तुटले असून, पायाखालचे पत्रेही खराब झाले आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या पुलाबाबत नगरपंचायतीला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, नागरिकांनी लोकवर्गणी जमा करून स्वतः पुलाची काही प्रमाणात दुरुस्ती केली होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg