loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची ७ सुवर्ण, ६ रौप्य, ७ कांस्य पदकांची कमाई.

खेड(प्रतिनिधी)- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत संगमेश्वर तालुका तायक्वांदो ऍकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वी सब-ज्युनिअर व ज्युनिअर व ९ वी कॅडेट, २४ वी सिनिअर क्योरुगी आणि १३ वी सब-ज्युनिअर, ९ वी कॅडेट, १३ वी ज्युनिअर व सिनिअर पुमसे जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण, ६ रौप्य, ७ कांस्य पदकांची कमाई केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर स्पर्धा ओमेगा गार्डन हॉल, सावरकर चौक, देवरुख, ता. संगमेश्वर येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून ६०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या जिल्हास्तरीय तायक्वॉडो स्पर्धेत रुद्र अधावडे, ओम गोगावले, ईश्वरी गोरे, रुद्रनिल मोहिते, अर्णव गोफाणे, स्वरा चव्हाण, आयुष जाधव यांनी सुवर्ण पदक देवाशिश तपकिरे, कार्तिक चव्हाण, अंश धामणकर, सई गोगावले, शांभवी वाघ, सई चाळके यांनी रौप्य पदक तसेच श्लोक देवकाते, उदय मोरे, निमिष शिंदे, आर्या कदम, मानव सागवेकर, जिग्नेश आखाडे व स्वस्तिका खरावते यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली.

टाइम्स स्पेशल

या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण व तायक्वॉडो प्रशिक्षक पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे शाळेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भुमिता पटेल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg