loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड : संगलट मराठवाडी येथे विहिरीत वृद्धेचा मृतदेह आढळला

खेड : तालुक्यातील संगलट मराठवाडी येथे ७० वर्षीय वृद्धेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रभागा बबन बुरटे (वय ७०, रा. संगलट मराठवाडी, ता. खेड) या संगलट येथील बागेतील विहिरीत पाण्यावर उपड्या अवस्थेत तरंगताना आढळून आल्या. ही बाब निदर्शनास येताच ग्रामस्थांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वृद्धेच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg