loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रवासी वर्ग झाडाखाली सावलीला बसू शकतील, असे नियोजन करून झाडे लावा: तहसीलदार परीक्षित पाटील

वरवेली (गणेश किर्वे) - भविष्यात प्रवासी वर्ग वेळेअभावी प्रवासी पत्र्याच्या शेडखाली न बसता झाडाखाली सावलीत बसू शकतील, असे नियोजन करून झाडे लावा, असे प्रतिपादन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले. आज एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेला ते बोलत होते. तसेच हा वृक्षारोपण कार्यक्रम आज पुरता मर्यादित न ठेवता त्याचे संगोपनही करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दोन झाड दत्तक घ्यावी, तसेच मोकाट गाईगुरांपासून बचाव करण्यासाठी त्यावर काही उपाययोजना करावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झाडे लावा, झाडे जगवा.. यासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय आहे. आजच्या प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीतही एसटी महामंडळ जनतेला चांगली सेवा देत आहे. आज अनेक यशस्वी माणसांमागे एसटी महामंडळाचे मोठे योगदान आहे कारण आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यामध्ये एसटी बसने वेळेवर पोचल्यामुळे आज ती उच्च पदावर पोहोचलेली आहेत. हे नाकारून चालणार नाही असे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

या वृक्षारोपण कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, उपसभापती निलेश सुर्वे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, आगर व्यवस्थापक दीपक चव्हाण, स्थानक प्रमुख स्वप्निल शिंदे, लायन्स क्लबचे निखिल तांबट, संतोष वरंडे, श्यामकांत खातू,माधव ओक, नितीन बेंडल, प्रवासी संघटनेचे पराग कांबळे, मंदार कदम, एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवले यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg