loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे गावचे सुपुत्र गुरुप्रसाद मावळणकर यांना डॉक्टरेट, देवळेसह संगमेश्वर तालुक्याचा गौरव

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र डॉ. गुरुप्रसाद राजेंद्र मावळणकर यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री (सेंद्रिय रसायनशास्त्र) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून देवळे गाव, संगमेश्वर तालुका तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. गुरुप्रसाद हे राजेंद्र गंगाराम मावळणकर व स्नेहा राजेंद्र मावळणकर यांचे सुपुत्र असून, वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण संशोधनाच्या बळावर ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या या यशामुळे देवळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील तरुणांना उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. डॉ. गुरुप्रसाद राजेंद्र मावळणकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या भावी संशोधन कार्यासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी परिसरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg