खेड(प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आडे - कोळीवाडा येथील झेंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करत असताना, विजेचा जोरदार धक्का लागल्याने, पुष्पा जगदीश नांदगावकर (वय ३८) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील महिला एकत्र येऊन सार्वजनिक सभागृहाची स्वच्छता करत होत्या. या दरम्यान सभागृहाच्या गॅलरीत काम करत असताना पुष्पा नांदगावकर यांचा अचानक पाय घसरला आणि तोल गेला. तोल सावरण्याच्या प्रयत्नात त्यांचा हात सभागृहाच्या बाजूने जाणार्या विजेच्या मुख्य वाहिनीच्या (मेन लाईन) तारेला लागला.
विजेचा तीव्र झटका बसल्याने, त्या जागीच गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी आंजर्ले येथील डॉ. पाटील यांच्याकडे नेले, त्यानंतर पुढील उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून, त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.