मालवण (प्रतिनिधी) - समाजात अजूनही अनेक अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आहेत. माणसांच्या अज्ञानाचा, मनातील भीतीचा आणि अंधश्रद्धाळूपणाचा फायदा घेत भोंदू बाबा अशा लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात करतात. जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाकडून होणारे शोषण आणि पिळवणूक थांबविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने संमत केला. तो लोकांनी समजून घेऊन स्वतःतील विवेक जागृत करून जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणावा, असे प्रतिपादन श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळाचे सचिव योगेश पाटील यांनी येथे बोलताना केले.
सामाजिक न्यायभवन विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन या योजने अंतर्गत जनजागृती कार्यक्रम भ. ता. च. म.मा. विद्यालय, चौके येथे प्रशालेच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी यांच्या सहकार्यातून नुकताच संपन्न झाला. त्यावेळी योगेश पाटील हे बोलत होते. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रसिका गोसावी, योगेश वराडकर, प्रशालेचे शिक्षक दत्तप्रसाद परुळेकर, नागेश गिरकर, संगिता जाधव, दुर्वा वारंग, अक्षता सोनवडेकर, अनिल आचरेकर, विजय डगला, भूषण अहिराव, सचिन शिंदे आणि शालेय कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तप्रसाद परुळेकर यांनी केले. यावेळी विजय चौकेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच जादूटोणा करणारे आणि भोंदू लोक जे चमत्कार आणि हातचलाखी करतात त्यांची विविध प्रात्यक्षिके चौकेकर यांनी संतांच्या दाखल्या सहित करून दाखविली. तसेच आपल्या गावात असे जर कोणी भोंदू बाबा काही चमत्कार करून दाखवित असल्यास त्याची तक्रार पोलिस ठाण्यात करावी, असेही आवाहन विजय चौकेकर यांनी केले. योगेश वराडकर यांनीही प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कडून अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ योगेश पाटील यांनी म्हणून घेतली. विजय डगला यांनी आभार मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.