loader
Breaking News
Breaking News
Foto

ॲड. दीपक पटवर्धन यांना 'सहकार गौरव पुरस्कार' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'सहकार गौरव पुरस्कार-२०२६' या समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना 'सहकार गौरव पुरस्कार-२०२६' राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत, सहकार राज्यमंत्री ना.पंकज भोयर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण व आ.प्रसाद लाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली होती. हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रातून केवळ चार पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सहकार महर्षी म्हणून विद्याधरजी अनासकर, सहकार रत्न म्हणून रेवतीताई पैठंणकर, सहकार भूषण म्हणून आ. विनयजी कोरे व सहकार गौरव म्हणून ॲड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

सहकारामध्ये उत्तम काम करणारे ॲड. दीपक पटवर्धन हे माझ्या मतदार संघातील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे वक्तव्य या कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात केले. सहकारामध्ये उत्तम काम करणारे व्यक्तींचा हा गौरव असून त्यांच्या चांगल्या व उत्तम कामाला शासनाचा नेहमी सपोर्ट राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg