loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील प्रतिष्ठीत नागरीक नुरमहंमद मुजावर यांचे निधन

केळंबे-लांजा(वार्ताहर):लांजा शहरातील प्रतिष्ठीत नागरीक नुरमहंमद अलीसाहेब मुजावर यांचे शनिवारी ४ जुलै रोजी पहाटे सहा वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 92 वर्षाचे होते. नुरमहंमद मुजावर हे लांजातील जुन्या पिढीतील मुस्लिम समाजामधील ज्येष्ठ व्यक्तीमत्व होते. सर्व समाजात त्यांना आदराचे स्थान होते. विविध सणा-उत्सवात ताशा वाजविणे ही त्यांची विशेष ओळख होती. ते आपल्या प्रेमळ, मनमिळावू आणि मार्गदर्शक स्वभावासाठी सर्वांमध्ये "मामु' या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg