loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलच्या सिद्धांत कांबळेचे स्कॉटलंड सॉलिसिटर परीक्षेत घवघवीत यश

पनवेल : पनवेलमध्ये राहणाऱ्या सिद्धांत या विद्यार्थ्याने स्कॉटलंडमधील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या क्वालिफाईड लॉयर्स असेसमेंट (QLA) परीक्षेत यश संपादन करून स्कॉटलंडचे पात्र सॉलिसिटर (Qualified Solicitor in Scotland) होण्याचा मान मिळवला आहे. लॉ सोसायटी ऑफ स्कॉटलंड यांनी मे २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करत सिद्धांत यांनी सर्व विषय यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. गुन्हेगारी कायदा, सार्वजनिक कायदा, युरोपियन कायदा, पुरावे, प्रक्रिया, व्यावसायिक आचारसंहिता, कन्व्हेअन्सिंग, अकाउंट्स रूल्स आदी सर्व विषयांमध्ये त्यांनी यश मिळवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्कॉटलंडमधील ही परीक्षा अत्यंत कठीण आणि दर्जेदार मानली जाते. अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर सिद्धांत यांनी हे यश मिळवत पनवेल शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सिद्धांत यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पनवेल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात असून, कायदे क्षेत्रात ते अधिक उंच भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg