loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी नीलम जोशी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण रोटरी क्लबची सन २०२६- २७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी नीलम जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी प्रविणा शिंदे व खजिनदारपदी प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते व क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने यांच्या उपस्थितीत दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे होणार आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी क्लब मालवणचे सदस्य तसेच जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे - प्रेसिडेंट - नीलम जोशी, व्हाईस प्रेसिडेंट - उमेश सांगोडकर, सेक्रेटरी - प्रविणा शिंदे, जॉईंट सेक्रेटरी - तनिष्का कासवकर, ट्रेझरर - प्रदीप सामंत, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट - पंकज पेडणेकर, क्लब सर्व्हिस - सुहास ओरसकर, कम्युनिटी सर्व्हिस - डॉ. लीना लिमये, व्होकेशनल सर्व्हिस - ऋषिकेश पेणकर, इंटरनॅशनल सर्व्हिस - डॉ. अजित लिमये, युथ सर्व्हिस - अभय कदम, रोटरी फाउंडेशन - प्रदीप जोशी, मेंबरशिप डेव्हलपमेंट - बाळू तारी, क्लब ॲडमिन - महादेव पाटकर, क्लब बुलेटिन - सुविधा तिनईकर, सार्जंट ॲट आर्म्स - कमलिनी प्रभू, स्पोर्ट्स चेअरमन - अमेय पारकर, क्लब ट्रेनर - भाऊ साळगावकर, लिटरसी प्रमोशन - रमाकांत वाक्कर क्लब फेलोशिप - उमेश हळदणकर.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg