loader
Breaking News
Breaking News
Foto

काय समजलीव आयोजित ’कोण होणार कोकणचा पहिला रिलबाज’ स्पर्धेचा सोहळा संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कलाविश्वात डिजिटल क्रांती घडवून आणणार्‍या ’काय समजलीव’ या संस्थेच्यावतीने आयोजित ’कोण होणार कोकणचा रिलबाज’ ही स्पर्धा यंदाही उत्साहात संपन्न झाली. सलग दुसर्‍या वर्षी आयोजित या स्पर्धेने कोकणातील उदयोन्मुख क्रिएटर्सना एक हक्काचा आणि भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ’नमन कोकणची लोककला’ या विषयावर आधारित या स्पर्धेत सहभागी झालेल्या तब्बल १४८ स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा कस लावत कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन डिजिटल रील्सच्या माध्यमातून घडवून आणले. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून श्रेयस माईन, सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून साहिल चरकारी, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रथमेश पवार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून साक्षी बने आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून साईप्रसाद विलणकर यांना गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्य स्पर्धेमध्ये ’झो मंडळी’ या टीमने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला, तर सुमित मालप याने द्वितीय आणि सौरभ बने याने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिके प्रथमेश पवार आणि रिध्देश मांडवे यांनी मिळविली, तर प्रेक्षकांच्या पसंतीचा ’बेस्ट रील’चा बहुमान नविल भोळे याने आपल्या नावे केला. या दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्याला रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, नमन लोककला मंडळाचे पी.टी. कांबळे, अकील नाईक आणि परेश साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करतानाच, कोकणची लोककला डिजिटल माध्यमाद्वारे नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. ’काय समजलीव’ या उपक्रमामुळे कोकणातील तरुण कलाकारांना आपली प्रतिभा जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक नवी प्रेरणा मिळाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg