loader
Breaking News
Breaking News
Foto

माथेरान वाघाचीवाडी नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी; ग्रामस्थांमध्ये संताप

पनवेल : माथेरान परिसरातील वाघाचीवाडी येथून नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही बाजूंना अनेकांनी व्यावसायिक उद्देशाने फार्महाऊस उभारल्याचा आरोप होत आहे. या फार्महाऊसधारकांनी नदीपात्रात कोणतीही सक्षम परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे तसेच साकव (पूल) उभारल्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिकांच्या मते, नदीपात्रातील या अनधिकृत बांधकामांमुळे नदीचा प्रवाह व दिशा बदलत असून पावसाळ्यात पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरते. यामुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्ता वाहून गेल्याने काही काळ वाहतूक व नागरिकांचा ये-जा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. या प्रकरणाची दखल घेऊन ग्रामविकास संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गणपत वारगडा यांनी पनवेलचे अपर तहसीलदार जितेंद्र इंगले पाटील तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे तातडीने हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, वाघाचीवाडी येथील नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांबाबत यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी व अर्ज देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता प्रशासन नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी प्रभावी पावले उचलणार का आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून हा विषय ग्रामस्थांमध्ये चर्चेचा बनला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg