loader
Breaking News
Breaking News
Foto

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा हीच आपली जबाबदारी आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार सामंत यांनी नागरिकांसाठी खालील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत: अनावश्यक बाहेर पडू नका: जोरदार पाऊस सुरू असताना घराबाहेर पडणे टाळा. धोकादायक ठिकाणी जाऊ नका: नदी, नाले, ओढे, धबधबे व समुद्रकिनारी जाणे टाळा. दरडीची शक्यता: डोंगर उतार भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, कारण दरड कोसळण्याची शक्यता आहे. विद्युत तारांपासून सावध: वीज कोसळण्याची शक्यता असल्याने झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ थांबू नका. प्रशासनाच्या सूचना पाळा: प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना आणि अलर्टकडे लक्ष द्या.

टाईम्स स्पेशल

"एकमेकांना मदत करा, अफवा पसरवू नका, जबाबदार नागरिक बना," असे आवाहनही आमदारांनी केले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियंत्रण कक्ष: 1077, पोलीस मदत: 100, आपत्कालीन सेवा: 108, महापालिका/स्थानिक प्रशासन: झोननुसार संपर्क साधा. आमदार किरण सामंत यांनी स्वतः पावसात उतरून परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. प्रशासन पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg