वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी तालुक्यातील गावडे-आंबेरे हे खारवी समाजाचे छोटेसे किनारी गाव असून येथील बहुतांश नागरिकांचा प्रमुख व्यवसाय मच्छीमारी आहे. वर्षातील सुमारे नऊ ते दहा महिने खोल समुद्रात मासेमारी करताना कुटुंबापासून दूर राहणारे मच्छीमार उर्वरित दोन महिन्यांच्या विश्रांतीच्या काळात कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा प्रयत्न करतात. याच भावनेतून गावातील काही जुन्या मित्रांनी एकत्र येत सन २०२३ मध्ये मैत्री ग्रुप गावडे आंबेरे या समूहाची स्थापना केली.
हा ग्रुप सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. त्याचबरोबर मच्छीमार बांधवांना आपल्या कुटुंबीयांसोबत काही आनंदाचे दिवस घालवता यावेत, या उद्देशाने दरवर्षी सहलीचे आयोजनही करण्यात येते. या उपक्रमांतर्गत सन २०२३ पासून दरवर्षी कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी सहलीचे आयोजन केले जाते. यंदा या परंपरेत आणखी एक धार्मिक पर्व जोडत दिनांक १७ जुलै ते १९ जुलै २०२६ या कालावधीत आई एकवीरा देवी दर्शनासह अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सहलीसाठी निघालेल्या सर्व सदस्यांना गावडे आंबेरेचे सरपंच लक्ष्मण सारंग तसेच उपसरपंच वैभव नाटेकर यांनी शुभेच्छा देत यात्रा सुखरूप, मंगलमय व यशस्वी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. धार्मिक श्रद्धा, मैत्रीचे बंध, कौटुंबिक आनंद आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम घडविणार्या मैत्री ग्रुप गावडे आंबेरेच्या या उपक्रमाचे गावकर्यांकडून कौतुक होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.