मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लवकरच व्यापक बदल होण्याची संकेत राज्य सरकारने दिले आहेत. केवळ योजनेचा विस्तार नव्हे, तर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सुधारणांचा मुद्दा विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून अत्यंत ठोसपणे मांडला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील उणिवा, रायगडसह अनेक भागांतील रुग्णालयांची कमतरता, रुग्णांचे आर्थिक शोषण आणि कर्करोग उपचारातील मर्यादा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी बोट ठेवले. त्यांच्या मांडणीची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ३० खाटांचा निकष शिथिल करण्यापासून कर्करोग उपचार पॅकेजेस अधिक व्यापक करण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांचे आश्वासन दिले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक लाभदायी करण्यासाठी शासन आवश्यक निर्णय घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे ही चर्चा केवळ प्रश्नोत्तरांपुरती मर्यादित न राहता राज्याच्या आरोग्य धोरणात बदल घडवून आणणारी ठरणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी चर्चेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जनआरोग्य योजनेच्या विस्ताराबद्दल अभिनंदन केले. पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांपुरती मर्यादित असलेली योजना सर्व नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय हा क्रांतिकारी असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आरोग्य सुविधा अद्याप अपुऱ्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांसाठी खुली करण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी, "योजना सर्वांसाठी खुली झाली असली तरी उपचार देणारी रुग्णालयेच अपुरी असतील, तर त्या निर्णयाचा अपेक्षित लाभ सामान्य नागरिकांना मिळणार कसा?" असा थेट सवाल उपस्थित केला. पनवेल तालुक्यात सुमारे २४० रुग्णालये असतानाही त्यापैकी केवळ ४० रुग्णालये जनआरोग्य योजनेशी संलग्न असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणले. रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये एकही संलग्न रुग्णालय नसल्याने रुग्णांना मुंबई, नवी मुंबई किंवा पुण्याकडे धाव घ्यावी लागत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या लक्षवेधीची गंभीर दखल घेतली आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अमुलाग्र बदल करण्याचे संकेत त्यांनी दिले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.