loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतळुक येथील घरामधे आढळलेल्या १० ते १२ फुट लाबं अजगराला जिवदान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील बलवंत गोडबोले यांच्या बंद घरात बाथरूममध्ये असलेल्या अजगराला आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर याने सुरक्षित पकडून जिवदान दिले. रविवार सकाळी कोतळूक येथील बंद असलेल्या या घरात साफसफाई करताना घर उघडले असताना दिपाली सचिन ओक यांना हा अजगर निदर्शनास आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर तात्काळ वनविभाग व आबलोली येथील सर्पमित्र जय काजरोळकर यांना संपर्क साधला तातडीने जय काजरोळकर याने त्या ठिकाणी येऊन १० ते १२ फुट लांब साधारण १४ ते १५ किलो वजनाचा जिवंत अजगर सुरक्षितपणे कोणतीही इजा न करता त्याला पकडून जिवदान दिले. जय काजरोळकर याला समीर ओक, संजय बाधावटे, सुनिल भेकरे, पराग नार्वेकर, मंदार गुहागरकर, प्रकाश नार्वेकर,अनू आरेकर, सौरभ आरेकर यांनी सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg