दापोली (प्रतिनिधी) : विधानसभा मतदार संघातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती'ची पहिलीच बैठक दापोली पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासनाचे राज्य मंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विषयक विविध विषयांवर सकारात्मक सविस्तर अशी चर्चा होत पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, मंडणगड पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, दापोली उपसभापती नम्रता तोडणकर, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, मंडणगड येथील जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, खेड येथील जिल्हा परिषद सदस्या मानसी महेश जगदाळे, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, माजी सभापती दिप्ती निखार्गे, दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमित वंजारे, दापोली, खेड व मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व पंचायत समिती सदस्य, तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी, उप अभियंता, बांधकाम विभाग, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, मंडणगड आणि खेड तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
दापोली विधानसभा मतदार संघाच्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे भरणे, नवीन उपकेंद्र निर्मिती चे प्रस्ताव सादर करणे, सर्पदंश-श्वानदंशावरील लसींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे यांसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत नाम. योगेश कदम यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार, सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा वेळेत पोहोचविण्यावर अधिक भर देत सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांचे सक्षमीकरण, स्वच्छता, लसीकरण, माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती, आरोग्य केंद्राच्या बांधकाम बाबत पाठपुरावा करणे, HPV लसीकरण काम वाढवणे, PMJAY चे camp आयोजित करुन कामकाज वाढवणे, समितीच्या त्रैमासिक बैठका नियमित घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
या बैठकीदरम्यान समितीचे प्रभावी कामकाज, आरोग्य सेवेतील समन्वय, स्थानिक स्तरावर उपचारांना प्राधान्य, १०८ रुग्णवाहिका सेवेचा प्रभावी वापर आणि उपजिल्हा रुग्णालयात सुविधा कार्यान्वित करण्याबाबत तसेच मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोयी सुविधाबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच रिक्त वैद्यकीय पदे भरणे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम रूमचे प्रस्ताव तात्काळ सादर करणे, आणि सर्व प्रा.आ. केंद्रात रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे भरणे अशा महत्त्वाचे सूचना करण्यात आली. दापोली उप जिल्हा रुग्णालयात महा डायलिसिस युनिट सुरु केल्याबद्दल मंत्री महोदय योगेश कदम यांचे अभिनंदन करण्यात आले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.