संगमेश्वर (प्रतिनिधी) - माध्यमिक विद्यालय, सोनवडेत एस.एस.सी व पाचवी ते नववी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त आणि प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खेडेकर, संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, अभिमन्यू शिंदे, अनिल नांदळजकर, विजय पांचाळ, संजय खेडेकर, आत्माराम शिगवण, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, महेश पवार, सचिन शिंदे, पूजा जाधव, समीरा पांचाळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. यानंतर प्रमुख अतिथी प्रमोद खेडेकर यांना शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक बंडगर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगती विषयीच्या ठळक गोष्टींचा उल्लेख केला. दहावीतील प्रथम क्रमांक निधी जाधव, द्वितीय क्रमांक वेदांत पांचाळ व तृतीय क्रमांक मधुरा शिंदे यांना दानशूर व्यक्ती व देणगीदारांच्या ठेवीतून दिली जाणारी बक्षिसे देण्यात आली. तसेच पाचवी ते नववीच्या प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रशालेतील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या ठेवीतून पुस्तके खरेदीसाठी रोख रक्कम देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता आदर्श विद्यार्थी म्हणून विराज बडद व मधुरा शिंदे यांना गौरवण्यात आले. तसेच संस्थेकडून मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गौरविण्यात आले. विजय पांचाळ यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे, तसेच शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. अभिमन्यू शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रमुख अतिथी प्रमोद खेडेकर यांनी संस्था स्थापनेपासून ते आजपर्यंत संस्थेच्या व प्रशालेच्या प्रगतीचा गौरव करून, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात संस्थाध्यक्ष सनगरे यांनी खेडेकर कुटुंबाची संस्थेप्रति असलेली तळमळ व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती देऊन, यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुलेखा मोहिते यांनी केले व आभार सायली बनकर यांनी मानले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.