loader
Breaking News
Breaking News
Foto

डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी वाशी उपकेंद्राची जनजागृती मोहीम सुरू

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - पावसाळ्यात डेंग्यू व मलेरिया या साथीच्या आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत "डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक महिना" साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, धामापूर आणि उपकेंद्र वाशी यांच्या वतीने वाशी तर्फे देवरूख, पाटगाव व देवरूख परशुरामवाडी परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांना घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळणे, पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवणे, टाकाऊ वस्तूंमध्ये पाणी साचू न देणे, सांडपाण्याचा योग्य निचरा करणे तसेच डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी, जाळ्या व डासप्रतिबंधक साधनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांमागे दुखणे किंवा अंगावर लाल पुरळ यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने उपकेंद्र वाशी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, धामापूर येथे जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. "स्वच्छ परिसर – डासमुक्त परिसर" आणि "डासांची आळी शोधा – डासांची आळी नष्ट करा" या घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून गाव डेंग्यू व मलेरियामुक्त ठेवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य सेवक विजय राऊत, आरोग्य सेविका प्रियांका इंगळे तसेच आशा सेविका मनिषा सावंत, प्रणिका लिंगायत आणि शर्मिला चाचे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg