loader
Breaking News
Breaking News
Foto

उसपमध्ये सासोलीची पुनरावृत्ती होऊ देणार नाही; खाण प्रकल्पाविरोधात काँग्रेस आक्रमक

तिलारी (प्रतिनिधी) - उसप परिसरात प्रस्तावित खाण प्रकल्पाविरोधात आता स्थानिक ग्रामस्थांसह काँग्रेस पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. "सासोलीची पुनरावृत्ती उसपमध्ये होऊ देणार नाही," असा इशारा देत आंबोली ते मांगेली या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कॉरिडॉरला धोका निर्माण करणारा कोणताही खाण प्रकल्प सहन केला जाणार नसल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी स्पष्ट केले. यावेळी बाबू गवस म्हणाले की, ग्रामस्थांना अंधारात ठेवून धनदांडग्यांच्या हितासाठी कोणत्याही हालचाली केल्या जात असतील, तर उसपवासीय त्याला जशास तसे उत्तर देतील. काँग्रेस पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा असून, स्थानिकांच्या हिताशी तडजोड होऊ देणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रस्तावित खाण प्रकल्पाबाबत पर्यावरणीय प्रश्न, जनसुनावणी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पर्यावरणासारख्या गंभीर विषयावर जनसुनावणी न घेता पुढील प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न होत असल्याने संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रकरणात होणाऱ्या स्थळ पाहणीसाठी प्रशासनाने पत्र काढले असून, त्यावर प्रतिक्रिया देताना बाबू गवस यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या कामांसाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात; मात्र खाण प्रकल्पाच्या बाबतीत प्रशासनाच्या हालचाली अतिशय गतिमान झालेल्या दिसत आहेत. ही घाई नेमकी कोणासाठी?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टाईम्स स्पेशल

उसपमधील ग्रामस्थांनी पर्यावरण, शेती, जलस्रोत आणि जैवविविधतेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करून प्रस्तावित खाण प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला असून, आगामी काळात लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg