loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती! वणौशीत ’कृषी स्नेही’ व ’कृषी सखी’ रावे गटातर्फे ’महाविस्तार एआय’ अ‍ॅपचे यशस्वी प्रात्यक्षिक

दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ’कृषी स्नेही’ व ’कृषी सखी’ रावे गटातर्फे वणौशी येथे शेतकर्‍यांसाठी ’महाविस्तार एआय’ अ‍ॅपचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सुलभ आणि फायदेशीर बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांना व शेतकर्‍यांना अ‍ॅपच्या वापराबाबत खालीलप्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आली: सोप्या पद्धतीने अ‍ॅप कसे इन्स्टॉल करावे याचे मार्गदर्शन, पीक सल्ला आणि अचूक हवामान अंदाज, कीड व रोग व्यवस्थापन, दैनंदिन बाजारभाव, शासकीय योजनांची सविस्तर माहिती, प्रत्यक्ष सहभागास प्राधान्य देत उपस्थित शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्यात आले व त्याचा वापर कसा करावा हे प्रत्यक्षात करून दाखवण्यात आले. या कार्यक्राला २३ शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थित शेतकर्‍यांनाअ‍ॅप डाउनलोड करुन देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या शिबीरात सर्व शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. यामध्ये २१ विद्यार्थ्यांनी अ‍ॅप डाउनलोड केले. या शिबीरास शेतकर्‍यांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल तीव्र उत्सुकता दाखवून विविध प्रश्न विचारले आणि शेतीत या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. हा उपक्रम कृषी महाविद्यालयाच्या डॉ. रमेश कुणकेरकर (सहयोगी अधिष्ठाता), डॉ. अशोक चव्हाण (रावे कार्यक्रम समन्वयक), डॉ. विजय देसाई (रावे केंद्र प्रमुख), डॉ. रणजीत महाडिक (विषय विशेषज्ञ), डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे (कार्यक्रम अधिकारी) या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg