loader
Breaking News
Breaking News
Foto

पोईप हायस्कुलच्या विद्यार्थी गुणगौरव व वार्षिक बक्षीस वितरण संपन्न

पोईप (वार्ताहर) -संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोईप हायस्कूलची वेगळी ओळख निर्माण होत आहे. हायस्कूल संस्था, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ या सर्वांचे सांघिक योगदान मिळत असल्याने पोईप हायस्कूलची प्रगती उत्तरोत्तर वाढतच आहे. याप्रशालेत पोईप दशक्रोशीतून विद्यार्थी प्रवेश घेत असून यापूर्वी या प्रसादेतून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मागील कित्येक वर्षे आपण या प्रभागाच्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून पद भूषविले असून यापूर्वी पोईप हायस्कूल साठी जिल्हा परिषद निधीतून विविध कामांसाठी निधी दिलेला असून यापुढेही पोईप हायस्कूलच्या शिल्लक भौतिक गरजांसाठी आपण कटिबद्ध राहू असे आश्वासन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या सुमेधा पाताडे यांनी दिले. पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सुमेधा पाताडे, उद्योजक सुरेश नेरुरकर, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब, संस्था सचिव विलास माधव, सत्यवान पालव, मोहन पांजरी, संदीप सावंत, कमलेश प्रभू, पंकज वर्दम, जितेंद्र परब, नितीन नाईक, राजाराम परब, आरटीओचे निरीक्षक रत्नकांत ढोबळे, मुख्याध्यापक विकास कुंभार, सहाय्यक शिक्षक- शिक्षिका, आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुमेधा पाताडे यांनी मागील काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शाळांच्या दर्जाबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. परंतु आपल्या मते आज जे विद्यार्थी माध्यमिक हायस्कूलमध्ये प्रवेश करतात त्यांचा शिक्षणाचा श्री गणेशा प्राथमिक शाळेतूनच होतो असे असताना प्राथमिक शाळांवर व शिक्षकांवर शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नव्हे अशा भावना व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर यांनी आज घडीला पोईप दशक्रोशीतून विद्यार्थी आपल्या प्रशालेत प्रवेश घेत आहेत. प्रशालेत येणारे विद्यार्थी व पालकांची मोठी अपेक्षा असून यांनी प्रशालेवर दाखविलेला विश्वास कधीही वाया जाणार नाही. यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक संस्था संचालक यांनीही मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे आलेल्या सर्वांना योग्य प्रकारे सहकार्य करून त्यांना चांगले मार्गदर्शन करावे असे आवाहन कांदळकर यांनी करून प्रशालीचे मुख्याध्यापक, सर्व सहाय्यक शिक्षक यांना मागील वर्षीच्या दहावी-बारावी व इतर स्पर्धा परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन करून धन्यवाद दिले.

टाईम्स स्पेशल

सन २०२५-२६ साठी प्रशालेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये प्रशालेतील आदर्श विद्यार्थी म्हणून रिया घाडीगावकर, हुशार व होतकरू विद्यार्थी म्हणून श्रवण परब, आदर्श शिक्षक पुरस्कार विष्णू महाजनी, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार विठोबा माधव, तसेच योगा पदविका अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण दिल्याबद्दल शाळेच्या शिक्षिका केतकी सावंत, ऋतुजा राऊळ, शिक्षक संतोष तावडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच राकेश परब यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू महाजनी व केतकी सावंत, प्रास्ताविक विकास कुंभार, तर आभार प्रसाद चव्हाण यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg