loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गावरील निष्काळजीपणामुळे संगमेश्वरात एसटी खड्ड्यात रुतली; प्रवाशांचा चार तास जीव टांगणीला

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामातील कथित निष्काळजीपणामुळे संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोर मुंबईकडे जाणारी एसटी बस खड्ड्यात रुतल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांना तब्बल चार तास मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरील काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर्स नसल्याने चालकाची दिशाभूल झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सेवा रस्ता समजून बस पुढे नेल्यानंतर मऊ माती व मोठ्या खड्ड्यात बसची पुढील चाके रुतली. बस एका बाजूला कलल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिक, खासगी वाहनचालक आणि प्रवाशांनी दगड टाकून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. अखेर दोन हायड्रा मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नांनंतर एसटी बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या घटनेनंतर महामार्गाच्या कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारांमुळे मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg