संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रचितगड माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळुशेठ होडे होते. या कार्यक्रमाला नाना दास कॅश काऊ फिनसर्व्ह प्रा. लि.चे सचिव मिलिंद (मकरंद) जाधव, भाजप तालुकाध्यक्ष तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी विनोद म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, संस्था संचालक रोहिदास पोमेंडकर, शर्मिला पवार, पाचांबेचे सरपंच संदेश घाडगे, प्रदीप सोलकर, राहुल गुरव, राजेंद्र म्हस्के, प्रमोद म्हस्के, शांताराम भारती, मुख्याध्यापक बेंद्रे सर, अत्तार सर, भांगे सर, चांदे सर, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व ३६ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे गणवेश, दप्तर, वह्या, २० पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, रंगपेटी, ड्रॉईंग बुक,छत्री तसेच वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा विद्यमान भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या स्वखर्चातून राबविण्यात आला.
यावेळी बोलताना विनोद म्हस्के म्हणाले की, "शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य देण्याचा शब्द मी दिला होता. आज मान्यवरांच्या उपस्थितीत तो शब्द पूर्ण करताना समाधान वाटत आहे. माझ्या शिक्षणाच्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होत नव्हते. त्या काळात सामाजिक संस्थांनी केलेल्या मदतीमुळेच मी शिक्षण पूर्ण करू शकलो. त्याच ऋणातून प्रेरणा घेऊन आज गरजू विद्यार्थ्यांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे." विद्यार्थ्यांनी दहावीपासूनच आपले ध्येय निश्चित करावे, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असे सांगत त्यांनी तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसायाकडेही वळावे, असे मार्गदर्शन केले. नाना दास कॅश काऊ फिनसर्व्ह प्रा. लि.चे सचिव मिलिंद जाधव यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी संस्थेचे अध्यक्ष तानाजी धावले यांचा संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उभी केलेली संस्था आज अकरा शाखांसह यशस्वीपणे कार्यरत असल्याचे सांगितले. मुंबईतील घाटकोपर येथे संस्थेचे भव्य कार्यालय उभारण्यात आले असून, संस्था गोरगरीब व गरजूंसाठी सातत्याने मदतीचा हात देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ आणि प्रतितगड माध्यमिक विद्यालयाच्या वतीने परिसरातील नऊ ग्रामीण गावांतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची नवीन इमारत उभारण्याचा संकल्प जाहीर करण्यात आल्याचे समजताच मिलिंद जाधव यांनी ही इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी आपण, माजी विद्यार्थी विनोद म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी एकत्रितपणे प्रयत्न करणार असून, गरज पडल्यास राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या निवासाची कायमस्वरूपी सोय करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही मान्यवरांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समिती, कार्यकारी मंडळ, माजी विद्यार्थी संघ तसेच सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा आणि समाजातील दानशूर व्यक्ती तसेच माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.