loader
Breaking News
Breaking News
Foto

जनतेच्या हक्कासाठी ठाम भूमिका; अखेर नांदिवली एसटी सेवा पूर्ववत

खेड (प्रतिनिधी) - अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने खेड–नांदिवली मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिल्यानंतर खेड–नांदिवली एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी ही एसटी सेवा पुन्हा मालदेपर्यंतच चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नांदिवली व व्हाहळी गावातील नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या अडचणीत सापडल्या. रेशन घेण्यासाठी नांदिवली येथे आलेल्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना परतीच्या प्रवासासाठी एसटी मिळणार नसल्याचे चालकाने सांगितल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जाब विचारला. मात्र सुरुवातीला अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना उद्दट व असमाधानकारक उत्तरे देण्यात आली. जनतेच्या हक्कासाठी आणि प्रवाशांच्या गैरसोयीचा निषेध म्हणून एसटी बस सुमारे दोन तास रोखून ठेवण्यात आली. यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत लोकप्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली. भविष्यात खेड–नांदिवली मार्गावरील सर्व एसटी फेऱ्या नियमित व सुरळीतपणे सुरू ठेवण्यात येतील तसेच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले. अधिकाऱ्यांकडून लेखी व तोंडी आश्वासन मिळाल्यानंतरच एसटी बस पुढील प्रवासासाठी सोडण्यात आली.

टाईम्स स्पेशल

जनतेच्या हितासाठी, त्यांच्या प्रवासाच्या हक्कासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे अखेर नांदिवली मार्गावरील एसटी सेवा नियमित सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, प्रकाश मोहिते, शिवसेना शाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg