loader
Breaking News
Breaking News
Foto

अलिबाग तालुक्यात पावसाची जोर"धार"

अलिबाग (प्रतिनिधी): गेली सलग पाच दिवस रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. शनिवार, रविवार अलिबाग शहरासह तालुक्यातील अनेक गावात,पावसाची जोर"धार" बॅटिंग सुरू झाली. अगदी दुपारपर्यंत पावसाच जोर कायम होता. अलिबाग शहरात तसेच पोयनाड बाजारपेठेत दुकानात पाणी शिरले. सहण पुलावरून पाणी वाहत आहे. वाहतूक थांबविण्यांत आली आहे. सुरुवातीला लांबलेला मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाला. आणि पहिल्याच आठवड्यात त्याने आपली कसर भरून काढली. धो-धो कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. वित्तहानी बरोबर जीविनहानी देखील झाली. अनेक रस्ते, पाण्याखाली गेले. नद्या, नाले, ओसंडुन वाहू लागले. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. शहरात पाणी तुंबल्याने दुचाकी बंद पडल्याचे पहायला मिळाले. एसटीच्या गाड्या देखील पूरस्थिती असलेल्या गावात सोडण्यात आल्या नाही. पावसामुळे त्या मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवारी सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. हळूहळू त्याचा जोर वाढत गेला. सखल भागात तर पाणी साचू लागले. अलिबाग शहरातील पीएनपी नगरात तर तलाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली. या पाण्यातून वाहन चालवणे जिकिरीचे झाले होते. अनेकांची वाहने पाण्यात बंद पडली. अलिबाग एस टी आगारात देखील पाणी शिरले होते. शहरातील रामनाथ, तळकरनगर या परिसरात घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. पोयनाड बाजपेठेमध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले, अशी माहिती तेथील दुकानदारांनी दिली. वीणा लक्ष्मी, परशुराम रेडीमेड, स्मिता स्पोर्ट, चिंतामणी हॉस्पीटल, वैशाली सोसायटी, प्रतिभा सोसायटी आणि अन्य ठिकाणी पाणी शिरले. पावसामुळे मोठी आर्थिक नुकसान झाल्याचे जैन यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

दुपारनंतर काहीकाळ जोर ओसरला, पण पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली. सहण पुलावरून पाणी वाहत आहे. वाहतूक थांबविण्यांत आली आहे. ताजपुर येथील गुरांचा गोठा पडला. फुफादेवी पाडा येथील घरावर झाड पडून अंशतः नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg