लांजा (वार्ताहर) - लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथील उड्डाणपूलाच्या भरावाच्या भिंतीच्या सिमेंटकाँक्रीट प्लेट ढासळत असून भरावावरील भागात बनविलेला डांबरी रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने रस्त्यावरील डांबरीकरणाला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम डेडलाईनच्या आधी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांसह वाहनचालकांकडुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर लांजा शहरातील रखडलेल्या उड्डाणपूल आणि भरावाच्या भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र भरावाच्या भिंतीचे हे काम अत्यंत तकलादु असल्याचे बोलले जात आहे. डेडलाईनच्या आधी काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि लांजातील स्थानिक नागरिक यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. लांजा उपशेट्येवाडी येथे उभारण्यात आलेल्या भरावाच्या भिंतीच्या सिमेंट काँक्रीट प्लेट दोन दिवसांपूर्वीच ढासळल्या होत्या.
ही बाब ठेकेदार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर लगेचच त्याठिकाणी सिमेंट लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर भरावाच्या भिंतीवर तयार करण्यात येणारा डांबरीकरणाचा रस्ता एका ठिकाणी खचला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा देखील पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे एकुणच या रस्त्याच्या कामाचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी संभाव्य दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.