सावंतवाडी : जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या विद्यार्थी व शिक्षकांनी यशाचा आलेख कायम राखला. प्रशालेचे 26 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले असून त्यातील 8 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेत. उर्वी दत्तात्रेय आठलेकर ही राज्य गुणवत्ता यादीत 17 वी आली असून शहरी विभागात जिल्ह्यात 3 री आली आहे. तसेच राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या गणित प्रज्ञा परीक्षेत या शाळेतील 2 मुलींनी गोल्ड मेडल तर 2 मुलींनी सिल्व्हर मेडल मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेच्या पटसंख्येत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 2 री आणि 6 वी साठी ऍडमिशन वेटींग लिस्टवर ठेवण्याची वेळ शाळेवर आली आहे. शिक्षकांची प्रचंड मेहनत, विद्यार्थी व पालक यांची साथ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा भक्कम पाठिंबा यामुळेच हे उज्ज्वल यश शाळेला मिळते आहे.
यातज्ञउर्वी दत्तात्रेय आठलेकर राज्य गुणवत्ता यादीत 17 वी, जिल्ह्यात 3 री, गणित प्रज्ञा परीक्षेत गोल्ड मेडल्स विजेती ठरली. तर राजनंदिनी चंद्रशेखर सावंत जिल्ह्यात 6 वी तसेच गणित प्रज्ञा परीक्षेत गोल्ड मेडल्स विजेती, अनुप्रिया अजित राणे जिल्ह्यात 11 वी तसेच गणित प्रज्ञा परीक्षेत सिल्वर मेडल्स विजेती, देवाशिष विलास फाले जिल्ह्यात 17 वा, अन्वी केदार म्हस्कर जिल्ह्यात 24 वी, ईशा सचिन तुयेकर जिल्ह्यात 26 वी, आद्या निनाद नाईक जिल्ह्यात 30 वी, सिया अभिजीत शेटकर जिल्ह्यात 49 वी, उर्वी अमितकुमार टक्केकर गणित प्रज्ञा परीक्षेत सिल्वर मेडल्स विजेती ठरली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक महेश पालव, पूजा शिंदे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर, सहकारी शिक्षिका अंजना घाडी, प्रणिती सावंत, दक्षता गवस, वर्षा नाईक आणि शिल्पा जाधव या सर्वांची सक्षम साथ मिळाली. मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक 6 मुले शिष्यवृत्ती धारक असणारी जिल्हा परिषदेची ही शाळा ठरली होती. सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष तसेच विश्वकोश मंडळाचे सदस्य म . ल. देसाई, गुरुनाथ राऊळ, विजय देसाई आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन मुलांचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी मुलांसाठी विशेष बक्षिसे जाहीर केली आहेत. सर्व स्तरातून शाळेच्या यशाचे कौतुक केले जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.