loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे ५१ वृक्षांचे वृक्षारोपण उत्साहात

खेड, : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे “५१ वृक्षांचे भव्य वृक्षारोपण” अभियान रविवारी सकाळी खेड नगरपालिका नवीन मैदान तथा बदामी रोड येथे उत्साहात पार पडले. या उपक्रमात लायन्स सदस्यांसह मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ वृक्षांची लागवड केली. “आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली जीवनाची अमूल्य भेट” हा संदेश देत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. या प्रसंगी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य राजू कोळवणकर, लक्ष्मीलाल जैन, राजन वानरसे, लायन रत्नाकर शिलेवंत तसेच डॉ. शेळके, डॉ. शेळके, एलआयसी अधिकारी अश्रफ बुरोंदडकर यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष लायन अविनाश दळवी, सचिव लायन उत्तम कांबळे, माजी अध्यक्ष लायन महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष लायन पंकज शहा, माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे, माजी अध्यक्ष लायन सुरेश चिकणे, खेड नगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य लायन राजेश जोयसर, लायन परेश चिखले, लायन शैलेश धारिया यांच्यासह अनेक लायन्स सदस्यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान दिले. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी भविष्यातही पर्यावरण, शिक्षण, आरोग्य व समाजहिताचे विविध उपक्रम राबवत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg