दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी मधील एका हॉटेलमध्ये भावासोबत वडापाव आणण्यासाठी गेलेल्या एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणार्या एका ५० वर्षीय व्यक्तीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात पोस्को व भारतीय न्याय संहितेच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडित रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वळणे एमआयडीसी मधील एका हॉटेलमध्ये काल सायंकाळी ६ वाजणेचे सुमारास १२ वर्षाच्या भावासोबत एक ७ वर्षीय बालिका वडापाव घेण्यासाठी गेले होते. तेथील किशोर भगवानजी पटेल (वय ५०) याने या मुलीच्या भावाला पाणी आणण्यासाठी दुसरीकडे पाठवले व या बालिकेला घेऊन हॉटेलच्या किचनमध्ये नेले तेथील दरवाजा बंद केला व तिच्याशी लैंगिक चाळे केल्याचे म्हणणे बालिकेने रडतच आपल्या कुटुंबियांकडे व्यक्त केले. घरी गेल्यावर या बालिकेने तिच्या आईला झालेली घटना सांगितल्यावर काल रात्री उशिरा संशयित किशोर भगवानजी पटेल याचेविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार संशयित किशोर पटेल याचेविरोधात पोस्को व भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.