loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल; योगेश सपकाळ प्रथम

सावंतवाडी, (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा यंदा शंभर टक्के निकाल लागला आहे. अभ्यासक्रमात योगेश सपकाळ यांनी ७४.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चेतन बोडेकर यांनी ७३ टक्के गुणांसह द्वितीय, तर प्रफुल्ल जाधव यांनी ७२.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाचे हे अभ्यासक्रमाचे २२ वे वर्ष असून विद्यार्थ्यांना केंद्र संयोजक राजेश मोंडकर, माजी केंद्र संयोजक संदीप तेंडोलकर तसेच मंगल नाईक-जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अभ्यासकेंद्र प्रमुख रमेश बोन्द्रे, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, डॉ. जी. ए. बुवा आणि ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्र किंवा केंद्र संयोजक राजेश मोंडकर आणि मंगल नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg