loader
Breaking News
Breaking News
Foto

12 जुलै रोजी खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा गुणगौरव सोहळा

खेड - तालुका कुणबी कर्मचारी संघाचा गुणगौरव सोहळा 12 जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे अध्यक्ष राजेंद्र रामचंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये कुणबी समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, कला-क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे विद्यार्थी त्याचप्रमाणे नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन, बीडीएस, जेईई, नीट या परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमांमध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था विभाग रत्नागिरी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समाजातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, पदवीधर झालेल्या युवकांचा देखील सत्कार होणार आहे. याबरोबरच समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार होणार आहे.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित कदम रवींद्र हरावडे (माध्यमिक विभाग), शरद कदम, प्रमोद म्हादे, तुकाराम काताळे (प्राथमिक विभाग) संदेश म्हादलेकर (आरोग्य विभाग) आदी मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनी व सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, प्रसिद्धीप्रमुख शशिकांत भुवड यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg