loader
Breaking News
Breaking News
Foto

गेल्या १२ वर्षात शिक्षणावर खर्च कमी आणि गडकरींच्या मंत्रालयावर लक्ष केंद्रित; प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांची पोस्ट

नवी दिल्ली - कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि नीट पेपर फुटल्याचा वाद यातच आता शिक्षण खात्यावरील तरतूदीची चर्चा तीव्र होताना दिसत आहे. लेखक व इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी एक अहवाल शेअर करताना म्हटले आहे की, २०१३-१४ मध्ये शिक्षा मंत्रालयाची केंद्रिय अर्थसंकल्पात भागीदारी ४.६ टक्के होती. जी घटून २०२५-२६ मध्ये २.५ टक्के झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. गेल्या १२ वर्षात शिक्षणावर खर्च कमी करण्यात आला आणि गडकरींच्या मंत्रालयावर लक्ष केंद्रित झाल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नीट प्रवेश परिक्षा प्रकरणासंदर्भात दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आता मोठे स्वरुप धारण करीत आहे. विद्यार्थ्यांची मागणी फक्त नीट प्रकरणात मर्यादित राहिली नाही तर आता शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधाराची मागणी केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

रामचंद्र गुहा यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्स वर एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालातील दाव्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात केंद्रिय अर्थसंकल्पात शिक्षण मंत्रालयाचा सहभाग निम्म्यावर आला आहे. मात्र रस्ते, परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांचा सहभाग ३ टक्कयांनी वाढविण्यात आला आहे. सरकार शिक्षण क्षेत्राला प्राथमिकता देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या १० वर्षात भारतात १५० पेक्षा अधिक परिक्षांचे प्रश्नपत्र लीक झाल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg