loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुभाष खोत यांचा प्रेरणादायी उपक्रम

वरवेली (गणेश किर्वे) - सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने प्रा. सुभाष खोत यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाटपन्हाळे महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची संपूर्ण वार्षिक शैक्षणिक फी स्वतः भरून एक आदर्श उपक्रम राबविला. यंदा एकूण २३ हजार ५०० इतकी फी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या उपस्थितीत भरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोलाची मदत करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उदात्त हेतूने प्रा. खोत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद मिळत असून समाजापुढे सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण होत आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रा. सुभाष खोत यांच्या सामाजिक जाणिवेचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्याबरोबरच समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

समाजात शिक्षणाला प्रोत्साहन देणारे आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे प्रा. सुभाष खोत यांचे हे कार्य निश्चितच अनुकरणीय असून त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. अशा सेवाभावी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श सर्वांनी घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी अशी अपेक्षाही जनतेकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg