loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात रस्त्यावर, घरावर झाडे पडून नुकसान, काही ठिकाणी मार्ग बंद

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने अनेक गावात झाडे पडून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी झाडे मुख्य रस्त्यावर पडून वाहतूक बंद झाली. साटेली-परमे रस्त्यावर मारूती मंदीर ठिकाणी मुख्य रस्त्यावर वीज वाहिन्यांवर झाड पडून खांब रस्त्यावर पडले. वीज महावितरण कर्मचारी यांनी खांब बाजूला न केल्यामुळे सोमवारी रात्री अंधारात मोटार सायकलची खांबाला धडक बसून साटेली गावातील युवक गंभीर जखमी झाला. त्याला गोवा येथे हलविण्यात आले. कुंब्रल येथे घरावर नारळाचे झाड पडून नुकसान झाले. कळणे भिकेकोनाळ रस्त्यावर मोठे झाड पडून वाहतूक बंद झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग ते विजघर मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. वीज वाहिन्या तुटल्या तर काही ठिकाणी खांब देखील पडले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात सोमवारी मंगळवारी जोरदार वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. वीज पुरवठा खंडीत यामुळे मोठी गैरसोय झाली. सोसाट्याचा वार्‍यासह अनेक झाडे पुन्हा वीज वाहिन्या पडून अनेक ठिकाणी वीज खांब मोडून पडले यामुळे साटेली भेडशी गावातील वीज पुरवठा खंडीत होऊन गेले चार दिवस पाणी पुरवठा खंडीत झाला आहे, यामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

टाईम्स स्पेशल

सोमवारी कळणे भिकेकोनाळ रस्त्यावर भले मोठे झाड पडले यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. यामुळे काही वाहने सासोली येथून वळवली नंतर ग्रामस्थांनी हे झाड बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. आपत्ती व्यवस्थापन यांना कळवून झाड बाजूला करावे, अशा सूचना शिवसेना ठाकरे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली. सोमवारी रात्री उशिरा दादू यशवंत गवस यांच्या कुंब्रल येथील राहत्या घरावर माडाचे झाड पडून प्रचंड नुकसान झाले आहे. दोडामार्ग ते विजघर मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडून वीज पुरवठा खंडीत होऊन वाहतूक व्यवस्था देखील कोलमडून पडली. यामुळे अनेक ठिकाणी गैरसोय झाली. मंगळवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. तसेच प्रशासकीय यंत्रणांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg