loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायतच्या विकास आराखड्यावर ४११ हरकती, आराखड्यावरील हरकतींची २३, २४ जुलै रोजी सुनावणी.

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायतीच्या नव्याने सादर झालेल्या विकास आराखड्यावर दाखल झालेल्या हरकतींवर २३ व २४ जुलै रोजी सुनावणी लावण्यात आली आहे. याबाबतची नोटीस सध्या हरकत दाखल करणाऱ्या नागरिकांना गुहागर नगरपंचायतीच्यावतीने पाठवण्यात येत आहे. नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला सुरुवातीला शहरवासियांनी जोरदार विरोध केला होता. १८ मीटरचा रस्ता ९ मीटरवर आणून चुकीच्या पद्धतीने झालेल्या आरक्षणावरं बोट दाखवून अनेकांनी हरकती घेतल्या होत्या. सुमारे १५०० हून अधिक दाखल झालेल्या हरकतींवर काही मोजकेच बदल करून मार्च महिन्यामध्ये नव्याने विकास आराखडा नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विकास आराखड्यावरही शहरवासियांमधून नाराजीचा सूर उमटला. अपेक्षित असलेल्या रस्त्याची रुंदी कमी झालेली नाही, ज्या ठिकाणी विस्ताराला जागा आहे अशा ठिकाणी हरितपट्टा जाहीर केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त झाली आहे. मात्र, यावेळी केवळ ४११ हरकती दाखल झाल्या आहेत.नगरपंचायतीवर नव्याने स्थापन झालेल्या कमिटीसमोर हे एक प्रकारे आव्हानच बनले होते. अशा परिस्थितीमध्ये या नव्या कमिटीने प्रत्येक प्रभाग वार ग्रामस्थांचे विचार ऐकून तशा पद्धतीचा ठराव आपल्या सर्वसाधारण सभेतून वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.

टाईम्स स्पेशल

कंजस्टेड झोन निर्मिती, ग्रीन झोन कमी करणे, पासारखे विषय महत्वाचे ठरले एका बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री व औद्योगिक मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन गुहागरचा विकासा आराखडा व यावर असलेल्या नाराजीबाबत सांगण्यात आले, तर दुसरीकडे भाजपच्यावतीने नगरसेवकांनी कोकण विभाग सहसंचालक श्रीकांत देशमुख यांची भेट घेऊन विकास आराखड्यावरील हरकतींबबतची माहिती दिली. त्यानंतर मात्र कोणतीच हालचाल झाली नाही.दरम्यान, २३ एप्रिल पर्यंत दाखल झालेल्या एकूण ४११ हरकतींवर २३ आणि २४ जुलै रोजी गुहागरमध्येच सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीकडून प्राप्त झाली आहे व तशी नोटीस हरकती घेणाऱ्या सर्वांना पाठवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आता या हरकतींप्रमाणे ह्या विकास आराखड्यामध्ये बदल होईल का, हे सुनावणीनंतरच समोर येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg