loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड पं.स. ‘पाट’ येथील कृषी दिनाच्या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मंडणगड (प्रतिनिधी) - हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी संपूर्ण राज्यात ’कृषी दिन’ साजरा केला जातो. याचे औचित्य साधत मंडणगड येथील पाट येथे कृषी दिनाच्या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धानाचा महत्वाचा संदेश देत मागेल त्याला वृक्षाचे रोप देऊन वृक्षलागवडीला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण आणि समाजहिताचा कार्यक्रम मंडणगड पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रणाली संदेश चिले यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून राबवला. त्याची सुरुवातच आपल्या पाट या गावातून केली. या त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कामाचे तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभापती सौ. प्रणाली चिले यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे आणि गावामध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी आणणे हे होते. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला पाट ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील गावांनी आपल्या उपस्थितीची उस्फुर्त अशाप्रकारचा प्रतिसाद दिला त्यामुळे या कार्यक्रमाची यशस्वीपणे पार पडला. कृषी विभागाच्यावतीने मागेल त्याला काजू योजनेअंतर्गत काजू कलम वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच शेतकर्‍यांना बांधावर तुर बियाणे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पाट ग्राम पंचायतीचे सरपंच सचिन चिले, उपसरपंच सौ. लावण्या चिले, माजी सरपंच सतीश दिवेकर, माजी सरपंच सौ. सुषमा दिवेकर आदींसह पाट परिसरातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg