loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थी-युवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खेड तहसीलदारांना निवेदन

खेड - राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुक्याच्या वतीने आज खेड तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, एनटीए संदर्भातील प्रश्न तसेच पोलिस भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता यामुळे लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले असून, शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री ‘धर्मेंद्र प्रधान’ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ब्लॅक लिस्टेड किंवा संशयित परीक्षा केंद्रांवर तात्काळ कारवाई करावी, एनटीएA संबंधित जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पारदर्शक परीक्षा प्रणाली लागू करावी, पोलिस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थी व युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी खेडचे तहसिलदार सोनवने यांना निवेदन सादर केले. यावेळी खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम यांच्या नेतृत्वाखाली खेड शहरअध्यक्ष मंगेश भागवत व उपाध्यक्ष चंद्रशेखर हेळगावकर, माजी सरपंच मिलींद जाधव, जेष्ठ कैलास यादव पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शासनाने विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg