loader
Breaking News
Breaking News
Foto

पालपेणे येथील रक्तदाते उमेश खैर यांचा २६ जुलै रोजी श्रृंगारतळीत विशेष सन्मानाने गौरव होणार

वरवेली (गणेश किर्वे) - दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, समाजसेवक, रक्तदाता गुहागर तालुक्यातील पालपेणे गावाचे रहिवाशी उमेश खैर यांचा ४० वा वाढदिवस दि. २६ जुलै रोजी शृंगारतळी कुंभार समाजभवन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न ठेवता समाजसेवेसाठी एक पाऊल पुढे टाकून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान, सामाजिक उपक्रम, विशेष मुलांसोबत आनंदाचे क्षण आणि समाजहिताचे संदेश देत हा दिवस संस्मरणीय करण्यात येणार आहे. वाढदिवस म्हणजे समाजासाठी काहीतरी देण्याची संधी हा आदर्श या उपक्रमातून मांडण्याचा प्रयत्न आहे. २५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून अनेकांना जीवनदान देणार्‍या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करून गौरवण्यात येईल. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणजे समाजातील इतर नागरिकांनाही नियमित रक्तदानासाठी प्रेरणा मिळण्याचा प्रभावी प्रयत्न आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा रक्तदात्यांमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले असून ते समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. उमेश खैर स्वतःच्या वाढदिवशी २८ वे रक्तदान करून रक्तदान हेच सर्वोत्तम जीवनदान हा संदेश कृतीतून देऊन २९ वे रक्तदान करण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ एक विक्रम नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि मानवतेची जाणीव अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न आहे. जिल्ह्यातील विविध रक्तपेढ्यांना वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करून, रक्तदाते उपलब्ध करून देऊन, जनजागृती मोहिमा राबवून आणि सामाजिक संस्थांना जोडून सातत्याने सहकार्य करण्यात आले आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी अनेक लोकांना रक्तदान चळवळीत सहभागी करून घेण्याचे कार्य केले जात आहे. जीवन ज्योती विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे नाते जपणे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान आणि प्रेम मिळावे हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

गुहागर तालुक्यात स्वतंत्र रक्तपेढी (ब्लड बँक) असावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होईल, या उद्देशाने संबंधित यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिकांना एकत्र आणणे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गरज निर्माण व्हावे, प्रत्येक घरी किमान एक नियमित रक्तदाता असावा हे स्वप्न समोर ठेऊन त्यासाठी झटणार्‍या उमेश खैर यांनी रक्तदाता व्हाँटसअँप ग्रुप करुन या उपक्रमाशी निगडीत असणार्‍या रक्तदात्यांना एकाच व्यासपीठावर आणले आहे. तसेच त्यांना रक्तदान श्रेष्ठदान असल्याची जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg